Friday, February 26, 2010

नवी भरारी

आता हि कविता इतकेवेला review केली आहे कि वाचून वाचून आवडेनाशी झाली आहे.
आता जास्त चिकित्सकपण न दाखवता post करून टाकतो.

जुनी आठवण नवीन कोंदण
जुन्या घरट्याला नवीन अंगण

जुनाच रस्ता नवखं वळण
जुन्या हातात नवीन स्फुरण

जुनी कुपी नवीन अत्तर
जुन्या प्रश्नाला आज नवीन उत्तर

जीर्ण मनाला आज नवीन उभारी
जुन्याच आकाशात माझी नवी भरारी

Tuesday, February 9, 2010

चारोळी

हि एकमेव चारोळी मला आजही तेवढीच भावते

सूर्यापुढे दिव्यांची काय किंमत?
पण तो ही त्यांना समजून घेतो
दिव्यांसाठी संध्याकाळी
स्वतःला मालवून घेतो

Monday, February 8, 2010

पयलं नमन

ज्ञानेश्वराने permit दिलेलेच आहे sss कि
राजहंसाचे चालणे |
जगी झालीया शहाणे |
म्हणौनी काय कवणे |
चालोचि नये ||

मंडळी, राजहंसाचे चालणे अगदी मोठ्या ऐटीचे झाले असेल अगदी आपल्या लांजेकर
मामालेदारासारखे ( अरे, निदान हे नाव तरी बदलायचे होते.)
म्हणून काय बाकीच्यांनी चालूच नये कि काय sss

आमिरखान, अमिताभ असतील मोठे ब्लोगर ( वेगळी नावे... शाब्बास sss )
म्हणून काय ह्या रत्नागिरीकर वझ्याने ब्लॉगिंग करूच नये कि काय sss